पिंपरी (Pclive7.com):- भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या वतीने कारगिल दिनानिमित्त शहीद जवान सौरभ फराटे यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. ५० हजार रुपयांचा धनादेश शहीद सौरभ फराटे यांच्या मातोश्री मंगल नंदकुमार फराटे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. माजी सैनिक संघ भोसरी, महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशनच्या वतीने कारगिल दिनानिमित्त शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
भोसरीतील गावजत्रा मैदान येथे कारगिल दिनानिमित्त शहीदांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कारगिल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून कारगिल युद्धाच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. सर्व उपस्थितांनी सर्व जवानांच्या शौर्याला सलाम केला. यावेळी भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, कर्नल एस. पी. शुक्ला, प्रल्हाद जगताप, नवनाथ मोरे, बाबासाहेब तारडे, मेजर रवी सैनिक, ऑडनरी कॅप्टन भोसले, सुभेदार बी.एस. माने, महापौर राहुल जाधव, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, माजी महापौर नितीन काळजे, शिक्षण मंडळाच्या सभापती सोनाली गव्हाणे आदी उपस्थित होते.
माधव भंडारी म्हणाले, आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून वायू सेना दलाची भरती प्रकिया सुरु आहे. त्यांच्या प्रेरणेतून प्रामाणिकपणे कष्ट करणारे उमेदवार वायुदलात यशस्वी होतील. ही भरती सगळ्यांच्या दृष्टीने आयुष्यातला मोठा क्षण आहे. आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्यातून तरुणांना वायू दलात भरती होऊन देशसेवेच्या माध्यमातून आयुष्य घडविण्याची मोठी संधी मिळत आहे. यातून भरतीसाठी आलेल्या सर्व उमेदवारांना चांगला अनुभव मिळणार आहे.
महापौर राहुल जाधव म्हणाले, “देशाची एकता आणि अखंडता अबाधित राखण्यासाठी कित्येक भारतीय सैनिकांनी कारगिल युद्धात आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या वीरतेपुढे संपूर्ण देश कायम नतमस्तक आहे. शहीद झालेल्या वीर जवानांवर देशवासियांना गर्व आहे. कारगिल युद्धात सर्व सैनिक निष्ठेने लढले आणि देशाची विजयी पताका फडकावले. त्या सर्व सैनिकांना शतशः नमन करतो.






















Join Our Whatsapp Group