पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पिंपरी विधानसभेतील युवासेनेकडूनही अभिनव उपक्रम राबविण्यात आले. नचिकेत अनाथ आश्रम येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच येथील २ विद्यार्थ्यांच्या वार्षिक शैक्षणिक खर्चाची जबाबदारीही युवासेना पिंपरी विधानसभा तर्फे प्रतिक्षा घुले व निलेश हाके यांनी घेतली आहे.

तसेच पिंपरी युवासेनेच्या वतीने हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वाचनालय फुगेवाडी येथे पाण्याचा कुलर भेट म्हणुन देण्यात आला. याप्रसंगी युवासेना जिल्हा सन्मवका रुपेश कदम, युवती सेना अधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, विभाग संघटिका कामिनी मिश्रा, कल्पना जाधव, पुनम गिलबिले, मोहनापुरे सर, नितिन सर, ॲड.अजित बोराडे, सनी कड, ओंकार जगदाळे उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group