पिंपरी (Pclive7.com):- घोषणा बंद करा.. नाही तर तिकीटच कापतो..! असा दम राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पिंपरी विधानसभेतील इच्छुकांच्या समर्थकांना दिला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काळेवाडी येथे आयोजित जाहिर मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी प्रदेश सरचिटणीस अमोल मितकरी, शेख सुबानअली महंमद, माजी आमदार आण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते नाना काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्याच्या सुरूवातीला शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांचे प्रस्ताविक सुरू होते. त्यावेळी पिंपरी विधानसभेतील इच्छुक माजी आमदार आण्णा बनसोडे, शेखर ओव्हाळ, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, नगरसेवक राजू बनसोडे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. एकच साहेब आण्णासाहेब.., पिंपरी का आमदार कैसा हो शेखर ओव्हाळ जैसा हो..! आपली ताई सुलक्षणाताई अशा घोषणा सुरू होत्या. त्यावेळी संतापलेल्या अजितदादांनी थेट माईक हातात घेतला. घोषणा बंद करा, नाही तर तिकीटच कापतो असा दम दिला. त्यानंतर समर्थकांनी तात्काळ घोषणाबाजी बंद केली.






















Join Our Whatsapp Group