पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महायुतीचे लक्ष्मण जगताप यांना कलाटे यांनी थेट आव्हान दिले आहे. या निवडणुकीत अपक्ष राहुल कलाटे यांना ‘बॅट’ हे चिन्ह मिळाले आहे.
चिंचवडमध्ये शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत महायुती समोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. आज उमेदवारांच्या माघारीचा शेवटचा दिवस होता. त्यात कलाटे यांनी त्यांचे आव्हान कायम ठेवले आहे. त्यानंतर निवडणुक विभागाकडून निवडणुक चिन्हांचे वाटप करण्यात आले. यात राहुल कलाटे यांना ‘बॅट’ हे चिन्ह मिळाले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे कलाटे यांना राष्ट्रवादीचा पाठींबा मिळण्याची शक्यता आहे.
आता विधानसभेत तिसऱ्यांदा उतरलेल्या लक्ष्मण जगताप यांची हँटट्रीक होणार की, राहुल कलाटे षटकार मारत त्यांची ही संधी हुकवणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. तुर्तास तरी कलाटे विरूध्द जगताप यांच्यात सुरशीची लढत होणार असेच चित्र दिसत आहे.