पिंपरी (Pclive7.com):- युवासेना पिंपरी विधानसभा व आरपीआय युवक आघाडी ह्यांची विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त बैठक पार पडली. यावेळी आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे ह्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी निवडणूक विषयी सूचना केल्या. महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.
युवासैनिक आणि आरपीआयच्या युवकांनी स्थानिक पातळीवर लक्ष केंद्रित करून काम प्रचाराचा वेग वाढवा व घरोघरी जाऊन आपल्या उमेदवारने केल्याल्या कामाचा लेखाजोखा पिंपरी विधानसभेतील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवावा असे मत आरपीआय नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी व्यक्त केले. यावेळी पिंपरी विधानसभा आरपीआय युवक अध्यक्ष केतन कांबळे, युवती अधिकारी प्रतिक्षाताई घुले, आकाश सोनवणे पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष, सागर ससाणे, विभाग संघटक निलेश हाके, संदीप तोरणे, विकास गायकवाड, रवी नगरकर, उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group