पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारार्थ बोपखेल व दापोडी येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेने भगव्या लाटेने उसळलेल्या गर्दीचा उच्चांक ओलांडला होता.
काल शुक्रवारी सायंकाळी फुगेवाडी येथून प्रचाराला सुरूवात झाली. भाजपा नगरसेविका आशा शेडगे, संजय कणसे, विशाल वाळुंजकर, आबा कोळेकर, रामदास भांडे, सुधीर चव्हाण, अमीर शेख, तर रिपब्लिकन पक्षाच्या चंद्रकांता सोनकांबळे, नंदू भुजंग, बंडू गायकवाड, भाऊसाहेब म्हस्के, साहेबराव ससाणे, सावित्रीबाई भोनले, शिवसेनेचे संजय नाना काटे, तुषार नवले, सुनिल ओव्हाळ, राजू सोलापुरे, अर्जुन जम, रियाज शेख आदींसह शेकडो कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते.
फुगेवाडी झाल्यानंतर बोपखेलमध्ये पदयात्रेला प्रारंभ झाला. युवती सेना प्रमुख प्रतिक्षा घुले व निलेश हाके यांनी ४० फूटी भव्य हार क्रेनला बांधून आमदार चाबुकस्वार यांचे स्वागत केले. फटाक्यांची आतिषबाजी, घोषणांनी बोपखेल परिसर या पदयात्रेने दुमदूमून निघाला होता.






















Join Our Whatsapp Group