पिंपरी (Pclive7.com):- लोकसभा व राज्यसभेमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (सीएए) मंजूरीचे लोण पिंपरी-चिंचवड शहरात पसरले असून आज शुक्रवारी विविध सामाजिक संघटनांनी या विधेयकाच्या विरोधात पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन केले.
या मार्गावरील वाहतूक ग्रेड सेपरेटरमध्ये वळविण्यात आली. तसेच पिंपरी चौकातून गांधीनगर, पिंपरी गावकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. आयोजकांकडून शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. ‘एनआरसी, सीएए गो बॅक, नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी’ अशा घोषणा यावेळी दिल्या. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
हे विधेयक राज्यघटनेच्या ,कलम १४ व १५ उल्लंघन असा आक्षेप एमआयएमने घेतला आहे. केंद्र सरकार भविष्यात राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर (एनआरसी) देखील आणणार आहे. दोन्ही गोष्टी एका विशिष्ट समाजाच्या व भारतीय संविधानाच्या विरोधात असून एका विशिष्ट समाजाला त्रास देण्यासाठी जाणीव पूर्वक हा कायदा बनवण्यात आला असल्याचा आरोप पिंपरीतील एमआयएमने केला आहे.






















Join Our Whatsapp Group