मुंबई (Pclive7.com):- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचं नवं पोस्टर आता समोर आलं आहे. २३ जानेवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेची उत्सुकता ताणली गेली आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. अशात विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्यचा असा मजकूर असलेलं पोस्टर लावण्यात आलं आहे. आज सकाळीही एक पोस्टर लावण्यात आलं होतं. ज्यामध्ये राज ठाकरे यांचा उल्लेख महाराष्ट्र धर्म सम्राट असा करण्यात आला होता. विशेष बाब म्हणजे शिवसेना भवनासमोरच हे पोस्टर लावण्यात आलं होतं. त्यापाठोपाठ आता आणखी एक पोस्टर समोर आलं आहे.

आज सकाळीच राज ठाकरे यांचं एक पोस्टर समोर आलं होतं. या पोस्टरमध्ये राज ठाकरे यांचा उल्लेख महाराष्ट्र धर्म सम्राट असा करण्यात आला आहे. महाराष्ट्रावर जेव्हा कधी संकट आलं आहे मग ते गोविंदा, गणेशोत्सव यावरचं असो किंवा रझा अकादमीच्या गुंडांनी घातलेला दंगा असो. राज ठाकरे आणि मनसे महाराष्ट्रासाठी उभी राहिली आहे असं या पोस्टरबद्दल संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. त्या पोस्टरनंतर आता नवं पोस्टर समोर आलं आहे. विशेष बाब म्हणजे या दोन्ही पोस्टरच्या मागे भगवा रंग वापरण्यात आला आहे. मनसे आणि भाजपा एकत्र येणार का? या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.






















Join Our Whatsapp Group