आळंदी (Pclive7.com):- आळंदी देवाची येथील खेड तालुक्याचे लाडके नेते अतुलभाऊ देशमुख यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने आळंदी शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने खास मुलींसाठी व महिलांसाठी मोफत तीन दिवसीय कराटे प्रशिक्षण शिबीर (सेल्फ डिफेंस) आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी पुणे जिल्हा, खेड तालुका व आळंदी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर नेते पदाधिकारी, कार्यकर्ते, मुली व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक अशोक कांबळे हे होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापुजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी अतुलभाऊ देशमुख यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी पुणे जिल्हा सरचिटणीस पांडुरंग ठाकुर, खेड तालुका अध्यक्ष अतुलभाऊ देशमुख, आळंदी शहर अध्यक्ष किरण येळवंडे, विद्यमान नगरसेवक सागरशेठ बोरूंदिया, सागर भोसले, गणेश राहाणे, प्रमिलाताई रहाणे, रूक्मिणीताई कांबळे, मा. नगरसेविका मालनताई घुंडरे, नियतीताई शिंदे, वंदनाताई सोनवणे, सैनिक आघाडी तालुकाध्यक्ष आनंद ठाकुर, प्रसिद्ध व्यवसायिक संजयजी राऊत, प्रदिप बाफना, आळंदी शहर कार्याध्यक्ष बंडूनाना काळे, ओबिसी अध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे, रविंद्र ठाकुर, राहुल घोलप, सदाशिव साखरे, आकाश जोशी, संकेत वाघमारे, सचिन काळे, मंडुबाबा पालवे, निलेश विर, महेश गायकवाड, प्रितम किर्वे, सचिन सोळंकर, सुरज रंधवे, विनोद कांबळे, स्वप्निल पळसकर, योगेश सावंत, संजय विश्वकर्मा, योगेश घाटुळकर, काका कुलकर्णी, राज डोंगरे, ज्ञानेश्वर चिंचकर, आदि मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी फ्रेंडस् क्लबचे प्रशिक्षक सुमित खंडागळे, स्नेहा देसाई, ज्ञानेश्वरी कोळी, प्रफुल्ल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच बारामती क्रिडा संकुल येथे झालेल्या राज्यस्तरीय तायक्वादो स्पर्धेत विजय मिळवून आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल प्रथम क्रमांक गोल्ड मेडल विजेते ऋग्वेद पवार, श्रेयश हुलजुते व द्वितीय क्रमांक सिल्वर मेडल विजेत्या श्लोका वागे, संस्कृती हुलजुते यांचा प्रशस्तीपत्रक व मेडल देउन सन्मान व सत्कार करण्यात आला. प्रस्तावना व सुत्रसंचालन भागवत काटकर यांनी व आभार प्रदर्शन किरण येळवंडे यांनी केले.






















Join Our Whatsapp Group