पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक २ जाधववाडी चिखली येथील संत शिरोमणी सावता माळी महाराज भाजी मंडईचे उद्घाटन भोसरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या शुभहस्ते सोमवारी संपन्न झाले. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर तथा प्रभागाचे विद्यमान नगरसेवक राहुल जाधव, दत्त दिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन मंगलताई राहुल जाधव, प्रितीताई बोंडे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते हनुमंत शेठ जाधव सामाजिक कार्यकर्ते नितीन बोराडे, रवी जांभूळकर, किसन बावकर, सतीश लांडगे, वाघोले, काका पंडित जाधव, नामदेव जाधव, संभाजी आबा घारे, प्रताप भांबे, सुरेश जाधव, त्याचप्रमाणे प्रभागातील सर्व ग्रामस्थ सर्व छोटे-मोठे व्यवसायीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी महापौर राहुल जाधव यांच्या संकल्पनेतून या भाजीमंडईची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना माजी महापौर जाधव म्हणाले कि, आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतील व्हीजन २०-२० च्या माध्यमातून या भाजी मंडईची निर्मिती करण्यात आल्याचे माजी महापौर राहुल जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच यापुढे जाधव सरकार चौक ते सावता माळी मंदिर या मार्गावर कुठल्याही प्रकारच्या व्यवसायांच्या टपऱ्या किंवा इतर व्यवसाय फुटपाथ वरती चालू असणार नाहीत अशी माहिती यावेळी राहुल जाधव यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, पूर्वी ही भाजी मंडई सेक्टर-१६ राजे शिवाजीनगर मधील डायगनो मॉल समोरील जागेमध्ये बसत होते. परंतु प्रभागातील जनतेला रहदारीच्या समस्येला मोठ्या प्रमाणामध्ये सामोरे जावे लागत होते. म्हणून नंतर काही दिवसात ही भाजी मंडई सेक्टर-१६ मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामधील मोकळ्या जागेमध्ये स्थलांतरीत करण्यात आली. परंतु नंतर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणामध्ये समस्यांचा सामना करावा लागला. यावेळी या भाजीमंडीतील सर्व छोट्या व्यावसायिकांनी तत्कालीन नगरसेवक राहुल जाधव यांच्याकडे या समस्या बाबत पाठपुरावा केला असता आपणा सर्व व्यवसायिकांना सुसज्ज आणि अशी भाजीमंडई बांधून देण्याचे आश्वासन राहुल जाधव यांनी त्यावेळी दिले होते. त्याच दृष्टीने या कामाचे पूर्ण नियोजन करून मागील एक वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी भाजी मंडीईची निर्मिती राहुल जाधव यांच्या माध्यमातून आणि आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्याने करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना राहुल जाधव यांनी सर्व व्यावसायिकांना मार्गदर्शन करताना सर्वांनी गुण्यागोविंदाने याठिकाणी आपला व्यवसाय करावा, त्याचप्रमाणे भाजी मंडीईची स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये सर्वांना यावेळी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे या भाजी मंडईमध्ये व्यवसायिकांना थेट पद्धतीने शेतकऱ्यांकडून शेतीमाल किंवा भाजीपाला विकत मिळवून देण्यासंबंधी नियोजन पुढच्या काळामध्ये करण्यात येईल, असे यावेळी राहुल जाधव यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी एकूण ७२ गाळ्यांचे वाटप याठिकाणी लकी ड्रॉ सोडत पद्धतीने गाळेधारकांना करण्यात आले. आजच्या या सोडतीमध्ये फक्त भाजी विक्रेत्यांसाठीच्या गाळ्याचे वितरण करण्यात आले. उर्वरित छोट्या व्यवसायांसाठी पुढील पंधरा दिवसांमध्ये परत एकदा लकी ड्रॉ पद्धतीने सोडत काढून राहिलेल्या उर्वरित गाळ्यांचे हस्तांतरण या व्यवसायिकांना करण्यात येईल, असे पुढे बोलताना जाधव यांनी सांगितले.
यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश दादा लांडगे यांची पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व भाजी व्यवसायीकांच्या वतीने आमदार साहेबांचा याठिकाणी सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार महेशदादा लांडगे यांनी या गाळेधारकांना पुढील व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच राहुल जाधव यांच्या या संकल्पनेला भरभरून दाद देत असताना आमदारांनी राहुल जाधव यांच्या कामाचे कौतुक केले. त्याचप्रमाणे या भाजीमंडई संबंधी जी काही नियमावली असेल त्या नियमावलीचे काटेकोरपणे आपण सर्वांनी पालन करावे असेही आवाहन यावेळी आमदारांनी केले. पुढील कालावधीमध्ये या व्यवसायिकांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यांसाठी सदैव तत्पर राहू असे आश्वासन यावेळी आमदार महेश लांडगे यांनी दिले. मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये हा गाळेधारकांना व्यवसायिक गाळे हस्तांतरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्व व्यवसायिकांच्या व महिला भगिनींच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. सर्वांनी माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक राहुल जाधव यांचे मनापासून आभार मानले.






















Join Our Whatsapp Group