पुणे (Pclive7.com):- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असुन मोदी व भाजपची सातत्याने समाजमाध्यमांवर बाजु मांडणारे पत्रकार भाऊ तोरसेकर आणि ‘पोस्टमन’ या पोर्टल वर हिंसक काॅमेंट करणाऱ्यांविरुद्ध राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
‘गेले अनेक महिने समाज माध्यमांवर टोकाच्या विद्वेषाची भावना पसरवणे, तसेच जातीय तणाव निर्माण करून महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय ऐक्याला तडा जातील, अशी अनेक पोस्टर्स सोशल मीडियावर पाहत आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे राजकारण थांबल्यानंतर हा प्रकार कमी होईल, असं वाटत होतं.’ त्यामुळे याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर पत्रकार भाऊ तोरसेकर, घनश्याम पाटील आणि इतर लोक सातत्याने यू ट्यूब, ‘पोस्टमन’ पोर्टल, टिकटॉकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधील भाषणे पाहिली, तर तरुणांमध्ये व समाजात ‘शरद पवार यांना संपवले पाहिजे, बॉम्ब व गोळ्यांचा वापर केला पाहिजे’, अशी चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचे निदर्शनास आल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group