पिंपरी (Pclive7.com):- इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या प्रीत राजेश शिरोडकरला १९७ देशांची नावे तोंडपाठ आहेत आणि ती सर्व नावे न अडखळता अवघ्या ९४ सेकंदात म्हणून दाखवण्याची किमया तो सहज करतो. प्रीतच्या या विक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाने घेतली आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रीतचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. हा किताब पटकावल्याबद्दल प्रीत शिरोडकरचा महापौर दालनात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी डॉ.ए. पी. जे अब्दुल कलाम यांचे “अग्निपंख”पुस्तक देऊन त्याचा गौरव करण्यात आला. महापौर ढोरे यांनी त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





















Join Our Whatsapp Group