पिंपरी (Pclive7.com):- हिंगणघाट घटनेतील क्रूर आरोपीला तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी करत भारतीय राष्ट्रवादी पार्टी युवा मोर्चाच्यावतीने चिंचवडमधील चापेकर चौकात निषेध नोंदविला. आत्तापर्यंत झालेल्या अशा घटनांमधील सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा भारतीय राष्ट्रवादी पार्टीच्यावतीने रस्त्यावर उतरून महाराष्ट्र भर आंदोलन करण्यात येतील असा इशारा महाराष्ट्र युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अजित संचेती यांनी दिला.
यावेळी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजय भोईर, पुणे जिल्हा युवा सरचिटणीस राहुल अवसरमल,पिंपरी चिंचवड युवा शहराध्यक्ष अक्षय घोडके, व तिन्ही विधानसभा अध्यक्ष व पक्ष्याचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
युवामोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अजित संचेती यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, ही घटना अत्यंत निर्दनीय घडली आणि महाराष्ट्रामध्ये अशा खूप घटना घडल्या आहेत. आतापर्यंत त्याचा निकाल ही लागलेला नाही. तसेच आरोपींना शिक्षाही झाल्या नाहीत. त्यामुळे हे कृत्य करणाऱ्या नराधमांना भिती राहिली नाही. म्हणून अशा आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा दिली पाहिजे. अन्यथा भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे कार्यकर्ते कायदा हातात घेऊन असे कृत्य करणाऱ्याला शिक्षा देतील, याला सरकार जवाबदार राहील असा अजित संचेती यांनी दिला आहे.






















Join Our Whatsapp Group