पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सत्तारूढ पक्षनेतेपदी नामदेव ढाके यांची निवड करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानंतर ही निवड करण्यात आली असल्याची माहिती भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, स्थायी सभापती विलास मडेगिरी, नामदेव ढाके, माजी पक्षनेते एकनाथ पवार, झामाबाई बारणे, प्रवक्ते अमोल थोरात, राजू दुर्गे, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे आदी उपस्थित होते.
भाजपच्या बैठकीत ढाके यांच्या नावावर एकमत करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीचे पत्र पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना देण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांचे पत्र येताच महापौर उषा ढोरे या ढाके यांना पत्र देतील. त्यानंतर ढाके यांची अधिकृतरित्या सभागृहनेतेपदी नियुक्ती होईल.






















Join Our Whatsapp Group