पिंपरी (Pclive7.com):- स्मार्ट सिटीत समावेश झालेल्या पिंपळे सौदागरची ‘क्लिन सौदागर गारबेज फ्री सौदागर’च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आज OPEL PRO SCRO मार्फत येथील ४५० फ्लॅट असलेल्या गणेशम् फेज-२ सोसायटीमध्ये ओल्या कचऱ्यापासून ४५० किलो क्षमता वजनी ‘कंम्पोस्ट खत’ निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले की, पिंपळे सौदागरची स्मार्ट सिटीसाठी करण्यात आलेली निवड ही परिसरातील नागरिकांनी सतत आपल्या सहभाग आणि योगदानातून योग्य ठरवली आहे. प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावत येथील नागरिक बरोबरीने ‘ओल्या कचऱ्याची विल्हेवाट’ या गंभीर प्रश्नावर मात देत आहेत. या प्रश्नापासून मार्ग काढण्यासाठी नागरिकांकडून महापालिकेला मोलाची मदत होत आहे. त्यांच्या या अमूल्य सहकार्याबद्दल तसेच जनजागृतीबद्दल विशेष आभार मानले पाहिजेत.
स्मार्ट सिटी ही फक्त पायाभूत सुविधेमुळे स्मार्ट होत नसते, तर ती सुविधा भोगणारी जनशक्ती सुद्धा स्मार्ट असावी लागते. पिंपळे सौदागरवासीयांनी हा स्मार्टपणा सतत सिद्ध करून दाखविला आहे. सौदागर मधील काही सोसायटीमध्ये कंपोस्ट खत प्रकल्प राबविण्यात आले आहे. तरी परिसरातील इतर सोसायटी आणि गृहनिर्माण संस्थानी देखील अश्याच पद्धतीने कंपोस्ट खत प्रकल्प राबवावे. तसेच यामध्ये तयार होणाऱ्या खताचा आपल्याच सोसायटी परिसरातील गार्डनमध्ये वापर करता येईल. तसेच एक लोकप्रतिनिधी या नात्याने कंपोस्ट खत प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही शत्रुघ्न काटे यांनी यावेळी दिली.
यावेळी गणेशम फेज-२ सोसायटीचे चेअरमन भानुप्रकाशजी, जितेंद्र लोडम, प्रदीप भुटाडा, दिपक कोल्हे व इतर सभासद उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group