पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे गुरव येथील श्री महाकालेश्वर मंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाशिवरात्री निमित्ताने होमहवन सौ.मुणालीनी व श्री. विजय कदम यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळची आरती सौ.ज्योती व श्री.रोहन शिंदे (खजिनदार) यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी दापोडी, सांगवी, नवीसांगवी, पिंपळे गुरव, फुगेवाडी या पंचक्रोशीतील महिला भजनी मंडळांनी सुश्राव्य अशी भजने सादर करून भक्तीमय वातावरण निर्मिती केली. मंदिराच्या वतीने सर्व शिवभक्तांना दिवसभर खिजडी, राजगिरा लाडु व फळे वाटप करण्यात आले. संध्याकाळी ७ वाजताची आरती अध्यक्ष युवराज कदम, रूद्रप्रताप शिंदे, शिवप्रताप शिंदे, शिवंजली पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. रात्री भस्मारती रविंद्र बाईत यांच्या हस्ते करण्यात आली. संपुर्ण दिवसभर पंचक्रोशीतील शिवभक्तांनी हजारोंच्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी गुजराती शिवभक्तांनी मिळुन मंदिर परिसरात सुंदर अशी फुलांची सजावट केली होती.






















Join Our Whatsapp Group