पिंपरी (Pclive7.com):- क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड बारा बलुतेदार समाज परिवर्तन प्रबोधनकार पुरस्कार प्रदान सोहळा चिंचवड स्टेशन येथे आज दि.२३ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न झाला. पिंपरी चिंचवड महानगर विकास अाघाडीच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन आघाडीचे सचिव तथा कार्याध्यक्ष युवराज दाखले यांनी केले होते.
प्रख्यात समाज प्रबोधनकार शाहीर बापू पवार (माढा सोलापूर), सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद कांबळे (पिंपरी चिंचवड) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून अखंड बाराबलुतेदार समाज बांधवांची सेवा करणे तसेच पाथारी व रिक्षाचालकांसाठी योगदान देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल या मान्यवरांना पुरस्कार देण्यात आल्याचे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजक युवराज दाखले यांनी सांगितले.
यावेळी संदिपान झोंबाडे, डॉ.मिलींदराजे भोसले, लेखक व शाहीर आसाराम कसबे, मनोज कांबळे, प्रा.धनंजय भिसे, सतिश अडागळे, संजय देडे, संजय ससाने, तुकाराम (महाराज)शिंदे, संजय बबन सवई, दिपक कांबळे, रविकिरण घाटकर, संजय ढोकोलिया, भारत गोडांबे, सागर कांबळे, रामाकिशन माने आदी मान्यवर उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group