पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडसह पुण्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश १८ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. मात्र तरी देखील पिंपरी चिंचवडमधील अनेक दुकाने सुरू असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे पोलीसांनी दुकाने सुरू ठेवणाऱ्या तब्बल १९३ दुकानदार, मालकांवर गुन्हे दाखल केलेत. (गुरूवार दि.१९ रोजी ९५) आणि (शुक्रवार दि.२० रोजी ९८) असे एकूण १९३ दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत.
देशासह राज्यावर कोरोना व्हायरसचे संकट ओढावले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी दि.१८ मार्च रोजी पुणे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, माँलस्, सर्व्हिस सेंटर, पान टपऱ्या, चहाची दुकाने, वडापावची दुकानं, तसेच गर्दी होणारे व्यावसायिक यांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तरी देखील पिंपरी चिंचवडकरांनी या आदेशाची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचं दिसत आहे. शहरात अनेक ठिकाणी दुकाने सर्रासपणे सुरू असल्यामुळे गर्दी होण्याचे प्रकार समोर येत आहेत. म्हणूनच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात दुकाने चालू ठेवणाऱ्या तब्बल १९३ दुकानदारांवर पोलीसांकडून गुन्हे दाखल केले आहेत. यात हॉटेल्स, ऑटोमोबाईल्स, सर्व्हिस सेंटर, टी-स्टॉल, वडापाव विक्रेते आदींची दुकाने सर्रासपणे चालू होती. म्हणूनच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अशा १९३ दुकान चालकांवर तसेच मालकांवर कलम १८८ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने गर्दी टाळण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि.२० मार्च रोजी पोलीस स्टेशन निहाय करण्यात आलेली कारवाई खालील प्रमाणे..
निगडी – ३
भोसरी midc – १७
तळेगाव midc – १
देहूरोड – १९
चिंचवड – ४
भोसरी – ४
पिंपरी – ३
सांगवी – १२
दिघी – ६
तळेगाव – ६
चिखली – १
वाकड – ८
हिंजवडी – १५
एकूण – ९८






















Join Our Whatsapp Group