पिंपरी (Pclive7.com):- कोरोना या महाभयंकर रोगाने जगभर थैमान घातले आहे. राज्यात कोरोनापासून बचाव करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत कु. सक्षम ढमाले यांनी आपला वाढदिवस थाटामाटात साजरा न करता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जावा, या उदात्त हेतूने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मास्कचे वाटप केले.
कु.सक्षम ढमाले याचा वाढदिवसाचे औचित्य साधून रात्रं दिवस आपल्या संरक्षणसाठी झटणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना जाऊन भेटून पाण्याच्या बाटली व मास्क वाटप केले. कोरोनापासून बचाव होण्यासाठी हे मास्क वाटप करण्यात आले. जय गोविंदा ग्रुपने पोलिसांना मास्क वाटप व पाण्याच्या बाटल्या दिल्या. यावेळी संतोष नायकवडी, संभाजी ढमाले, ऋषी मेहत्रे, प्रमोद शेंडगे उपस्थित होते.आयोजन जय गोविंदा ग्रुपने केले.