पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडी येथील मोलमजूरी करणाऱ्या ३० कुटूंबाना किराणा साहित्याचे संपूर्ण किट पिंपरी युवासेना व आशिर्वाद बचत गटाच्या वतीने देण्यात आले. या किराणा साहित्याच्या किटचे तात्या तापकीर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, आशिर्वाद महिला गटाच्या शिला जाधव, नंदूभाऊ काची, रुपेश गायकवाड, महेश बोधले, हर्षल वाणी उपस्थित होते.
सध्या संचारबंदीमुळे मोलमजूरी बंद आहे. हातावरचे पोट असल्याने एकवीस दिवस घरामध्ये बसुन अनेक कुटूंबांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. फुगेवाडीत काही लोक हे कामासाठी वास्तव्यास आले आहे. कमीत कमी १०८ पर्यंत यांची लोकसंख्या आहे. आज त्यांचा ठेकेदार गेल्या ८ दिवसांपासून गायब झाला आहे. त्यामुळे त्या कुटुंबांना उपासमारीची वेळ आली होती. आज त्या ३० कुटूंबांना किराणा साहित्याचे संपूर्ण किट देण्यात आले आहे.
कुठलीही गर्दी न करता social distancing पाळत लाभार्थींना मदत केली. साधारण १५ दिवस पुरेल इतका किराणा साहित्य सदरील किटमध्ये आहे. घरातील किराणामाल संपल्याने ही सगळी कुटुंबे मदतीच्या प्रतिक्षेत होती. किराणा साहित्य मिळाल्याने सदर कुटूंबियांना प्रचंड आनंद, समाधान व दिलासा मिळाला आहे.






















Join Our Whatsapp Group