पिंपरी (Pclive7.com):- भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील सफाई कामगार, पोलीस कर्मचारी तसेच गरजूंना अल्पोपहार वाटप करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष संदीप कांबळे व पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षा जयश्री संदीप कांबळे यांच्या हस्ते अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
राज्यासह संपूर्ण देशावर कोरोनाचं मोठे संकट ओढावलं आहे. प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. प्रशासनासोबत अनेक सामाजिक संस्थांकडून नागरिकांना मदतीचा हात दिला जात आहे. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष संदीप कांबळे व पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षा जयश्री संदीप कांबळे यांनी अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी तसेच गरजूंना अल्पोपहार वाटप केले.






















Join Our Whatsapp Group