पिंपरी (Pclive7.com):- चिंचवडमधील अक्षयभाऊ चव्हाण युवामंचच्या वतीने गरजूंना मदतीचा एक हात देण्यात आला आहे. चिंचवड गावातील विजयनगर परिसरात राहणार्या सुमारे २०० कुटूंबांना सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून अन्ननधान्याचे वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लागू असलेले लाॅकडाऊन ३० एप्रिल २०२० पर्यंत वाढवण्यात आले आहे. नागरीकांनी घरातुन बाहेर पडू नये, त्यांना लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तुंसाठी त्यांची धावपळ होऊ नये. या सर्व गोष्टींचा विचार करून अक्षयभाऊ चव्हाण युवामंच वतीने विजयनगर झोपडपट्टी चिंचवड येथे प्रत्येक घरोघरी जाऊन २०० कुटूंबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. घरात बसणार, कोरोनाला हरवणार असा संदेश व आपण लवकरच या संकटातून बाहेर पडू असा दिलासा सर्व नागरिकांना देण्यात आला.
यावेळी अक्षय विलास चव्हाण आणि त्यांचे सहकारी बाळु अडागळे, गणेश गायकवाड, आदित्य गवळी, रोहन मगर, अंगद कसबे, उमेश कांबळे, निकेश आल्हाट, सुनिल म्हेत्रे, अंकुश वाघमारे, साहिल जगताप, प्रदिप तेलंगे, किरण खरात, उमेश मगर, महेश पवार आदि उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group