पिंपरी (Pclive7.com):- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सध्या संपूर्ण देशामध्ये लॉकडाउन सुरू आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण मुंबई पाठोपाठ पुण्यात जास्त असल्याने तसेच पिंपरी चिंचवड शहराची कोरोना रुग्णांची संख्या ३१ वर गेली असल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील विद्यमान नगरसेवक सचिन भोसले यांनी पिंपरी चिंचवड शहर पूर्णता: बंद करण्यात यावे अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
मागणीच्या निवेदनात असे म्हटले आहे की, गेल्या सात आठ दिवसापासून या विषाणूचा संसर्ग वाढलेला दिसून येत आहे. या दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील काही परिसर सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु विषाणूचा संसर्ग पिंपरी चिंचवड शहराच्या इतर परिसरात वाढू नये यासाठी संपूर्ण शहर पुढील काही दिवसांसाठी पूर्णपणे लॉकडाउन ठेवून बंद करणे गरजेचे आहे. सध्या दररोज रुग्ण संख्येमध्ये झालेली वाढ पाहता प्रशासनाने आणखीण कठोर व ठोस निर्णय घेण्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याचेही नगरसेवक सचिन भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच स्विगी, पिझ्झा हंट, झोमॅटो, यासारखे होम डिलिव्हरी करणारे खाद्यपदार्थाच्या शाखा यांनाही बंदी घालण्यात यावी जेणेकरून नागरिकांना आरोग्याचा कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही, असेही नगरसेवक सचिन भोसले यांनी सांगितले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू शकतो त्यामुळे या संकटावर मात करण्यासाठी तसेच शहरातील कोरोना चा संसर्ग कमी करण्यासाठी शहरामध्ये कडकडीत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात यावा अशीही मागणी नगरसेवक सचिन भोसले यांनी महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.






















Join Our Whatsapp Group