पिंपरी (Pclive7.com):- क्रांतिवीर सांस्कृतिक कला क्रीडा व शिक्षण मंडळाच्या वतीने काळेवाडी परिसरातील नढेनगर येथील गरजूंना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर सरकारने लॉकडाऊन जाहिर केलायं. त्यामुळे हातावरचं पोट असलेल्या गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आलीयं. म्हणूनच सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत काळेवाडी येथील क्रांतिवीर सांस्कृतिक कला क्रीडा व शिक्षण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गरजू कुटूंबांसाठी मदतीचा एक हात दिलायं. नढेनगर परिसरातील गरजू कुटूंबांना किराणा सहित्याचे सोशल डिस्टंसिंगचा वापर करून वाटप केले आहे.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष योगेश शिरसाठ, विशाल खरे, अक्षय तांबे, चेतन शिरसाठ, तुषार खरे, विकास गोरे, अमर गाढवे, राजेश खांडेकर, अंकुश सगर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group