पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. लॉकडाऊनच्या सुरूवातीपासून पिंपरी युवासेना व आशीर्वाद महिला बचत गटाचे मदतकार्य सुरू अखंडपणे सुरू आहे. फुगेवाडी येथील कै. मीनाताई बाळासाहेब ठाकरे शाळेच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय मजूर कुटूंबांना पिंपरी युवासेना व आशीर्वाद महिला बचत गटाने अन्ननधान्याचे वाटप केले.
फुगेवाडी येथील कै. मीनाताई बाळासाहेब ठाकरे शाळा परिसरात परप्रांतीय मजूर वास्तव्यास आहेत. लॉकडाउनमुळे त्यांचे काम बंद आहे. हे मजूर ज्या ठेकेदारापाशी काम करत होते, तो सध्या त्यांच्या संपर्कात नाही. त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. परंतु पिंपरी युवासेना व आशीर्वाद महिला बचतगटाकडून त्या कुटुंबीयाना अन्नधान्य वाटप करण्यात आले. ह्यावेळेस पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, शीला जाधव, सुभाष गायकवाड उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group