पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज (दि.१७) दुपारी आलेल्या अहवालानुसार शहरातील पिंपळे गुरव, संभाजीनगर चिंचवड, आनंदनगर चिंचवड स्टेशन येथील ३ रूग्णांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. शहरात सध्या ६५ रूग्ण असून आजवरच्या रूग्णांची संख्या १९८ वर पोहचली आहे. दरम्यान शहरातील ११९ रूग्ण आजपर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर ४ आणि शहराबाहेरील ८ असे एकूण १२ जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरातील पिंपळे गुरव, संभाजीनगर चिंचवड, आनंदनगर चिंचवड स्टेशन येथील ३ रूग्णांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. यात दोन पुरूष आणि एका महिलेचा (पुरुष- २ वय- २७,५० वर्षे, स्त्री-१ वय-४० वर्षे) समावेश आहे.