पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढता प्रभाव रोखण्यासाठी महात्मा फुलेनगर, लांडेवाडीसह शहरातील सर्वच वसाहतींमध्ये तात्पुरते आरोग्य तपासणी केंद्र सुरू करण्यात यावेत अशी मागणी युवासेनेचे पुणे जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
जितेंद्र ननावरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आनंदनगरमध्ये सध्या वाढणारी covid19 रुग्णांची संख्या वाढत आहे. आनंदनगरप्रमाणे महात्मा फुलेनगर लांडेवाडी या ठिकाणी व शहरातील वसाहतीमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. आनंदनगरमध्ये ज्या वेगाने रुग्णसंख्या वाढली आहे त्या प्रकारे संसर्ग झाल्यास महात्मा फुलेनगर, लांडेवाडीची व शहराची देखील अशीच अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. जगात सध्या कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध नाही. या आजारावर वेळेपुर्वी काळजी घेतल्यास परिस्थिती आटोक्यात येण्यास मदत होईल. झोपडपट्टीतील नागरिक कोरोना बाबतीत माहिती व गांभीर्य नसल्याने याचे दुष्परिणाम सर्वच शहराला भोगावे लागतील. शहरातील झोपडपट्ट्यामध्ये कोरोनाचा विस्फोट होण्यापूर्वी महापालिकेने यांवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात महात्मा फुलेनगर, लांडेवाडी या ठिकाणी व शहरातील सर्वच झोपडपट्ट्यामध्ये तात्पुरती आरोग्य तपासणी केंद्र सुरू करणे बाबत उपाय योजना करावी. जेणेकरून वेळे पुर्वीच संशयित रुग्णांना ओळखून त्यांच्यावर उपचार करण्यास मदत होईल व झोपडपट्ट्यामधील होणारा कोरोनाचा उद्रेक रोखता येईल. आयुक्तांनी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी जितेंद्र ननावरे यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group