पिंपरी (Pclive7.com):- थेरगावमधील सामाजिक कार्यकर्ते रविदादा भिलारे यांनी आणखी एक यशस्वी उपक्रम राबविला आहे. रविदादा भिलारे सोशल फाऊंडेशन आयोजित रक्तदान शिबीरास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यावेळी ९० हून अधिक लोकांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला.
आज अख्खे जग कोरोना शी लढा देत आहे. आपल्या महाराष्ट्रात पिंपरी चिंचवडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात ही महामारी पसरत आहे. यात आपले डॉक्टर या महामारीशी खंबीरपणे लढा देत आहेत. मात्र या लढाईत रक्ताचा तुटवडा होणे साहजिकच आहे. हाच संकल्प लक्षात घेऊन रवी भिलारे यांनी “रवि दादा भिलारे सोशल फाउंडेशन” आयोजित मोरया ब्लड बँक चिंचवड यांच्या सहकार्याने थेरगाव येथे शिबीर राबवण्याचे योजिले होते. लॉकडाउनमुळे रक्तदान शिबीर व्हायचे काहीच संकेत नसताना सुद्धा फक्त रविदादांच्या विश्वासामुळे ९० लोकांनी आपले रक्तदान केले ते पण कोरोना संबंधित असलेल्या अटींचे पालन करून. प्रत्येकाकडे सॅनिटायझर, तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टंसिन्ग चे महत्व लक्षात घेऊन अत्यंत योग्य पद्धतीने एका उत्तम रक्तदान शिबिराची मुहूर्तमेढ रोवली गेली.
या सर्वांसाठी विजय मैड आणि राजू भुरुक या वरिष्ठांचे खूप उत्तम मार्गदर्शन लाभले. याच सोबत डॉ. इंदल, डॉ. माउली खोटे, डॉ. नितेश, डॉ. सागर आणि डॉ. करन.या डॉक्टरांचे सुद्धा कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. फक्त रविदादांच्या एका शब्दाचा मान ठेवून सर्वांनी ही रक्तदान शिबीर कार्यक्रम पार पडला.

























Join Our Whatsapp Group