पुणे (Pclive7.com):- लष्कराची गुप्तचर यंत्रणा आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त कारवाईत येरवडा परिसरातून जवळपास 10 कोटी रुपयांच्या बनावट नोटा आणि परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी एका लष्करी अधिकाऱ्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. विमाननगर येथील संजय पार्क या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांनी सांगितले की, लष्कराची गुप्तचर यंत्रणा आणि पुणे गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, येरवडा येथील संजय पार्कमध्ये बनावट नोटांचे रॅकेट चालवणाऱ्या टोळीवर छापा मारला. या कारवाईत जवळवास 10 कोटींच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून, याप्रकरणी एका लष्करी अधिकाऱ्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यात अनेक परदेशी चलनाच्या नोटांचाही समावेश आहे.























Join Our Whatsapp Group