पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत देहूरोड परिसरात विक्रीसाठी आणलेले देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसांसह ८३ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केलायं. गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने मुकाई चौक, देहूरोड येथे सापळा रचून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. शुभम गोविंद झगडे (वय १९ वर्षे रा.मु.पो. शेरी कोरेगाव भिमा जवळ, पाबळ ता.शिरूर जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे व गुन्हे शाखा युनिट ५ चे पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी धनंजय भोसले यांना खबरीकडून माहिती मिळाली की, एक इसम पांढऱ्या रंगाची ऍ़क्टीव्हा गाडी क्र.एम.एच.14 एफ एच 7246 या दुचाकी वरून मुकाई चौक येथुन सेंट्रल चौक देहुरोड येथे त्याचाकडे असलेले देशी बनावटीचे पिस्टल विक्रीकरीता येणार आहे. त्याने अंगामध्ये निळे रंगाचा जर्कीण व निळया रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी सोबतचे कर्मचारी यांना सुचना देवून त्यांच्या दोन टिम तयार करुन सापळा लावला. काही वेळाने तो इसम पुणेरी मिसळ हाऊसच्या समोर सेंट्रल चौक येथे येवुन त्याची गाडी कडेला लावून कोणाचीतरी वाट पाहत थांबला. त्याला पोलीसांचा सुगावा लागताच तो गाडी चालू करून पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव शुभम गोविंद झगडे, वय 19 वर्षे धंदा मजुरी रा मु.पो. शेरी कोरेगाव भिमा जवळ, पाबळ ता शिरूर जि पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे चौकशी करीत असताना तो घाबरुन उडवउडवीची उत्तरे देवु लागल्याने आम्हास त्याचा अधिक संशय आल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेस डावे बाजुस पॅन्टमध्ये खोचलेले एक देशी बनावटीचे पांढऱ्या रंगाचे पिस्टल मॅक्झीनसह मिळुन आले. तसेच डाव्या खिश्यामध्ये दोन जिवंत काडतुसे मिळुन आले. मिळुन आलेले पिस्टल व जिवंत काडतुस जवळ बाळगण्याचा परवाना आहे अगर कसे या बाबत विचारणा केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे देली. मात्र कसून चौकशी केली असता, त्याने ते पिस्तूल आणि काडतुसे विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. सदर आरोपी याच्यावर देहुरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त गुन्हे सुधिर हिरेमठ, सहा पोलीस आयुक्त गुन्हे राजाराम पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-5 चे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहा पोलीस निरीक्षक राम गोमारे व पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर गाडेकर, मयुर वाडकर, दत्तात्रय बनसुडे, दयानंद खेडकर, फारुक मुल्ला, संदिप ठाकरे, धनराज किरनाळे, गणेश मालुसरे, सावन राठोड, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, भरत माने, नितीन बहिरट, राजकुमार इघारे, श्यामसुंदर गुट्टे, गोपाळ ब्रम्हांदे, राजेंद्र शेटे व नागेश माळी यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group