पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीला अजून दिड ते दोन वर्षाचा कालावधी शिल्लक असताना राजकीय वातावरण पेटण्यास सुरूवात झाली आहे. प्राधिकरणात आज (दि.२१) शिवसेना नगरसेवक अमित गावडे आणि भाजपाचे पदाधिकारी अनुप मोरे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. अनुप मोरे यांनी ‘शिवसेना नगरसेवकासोबत का फिरतो’, असे म्हणत एका कार्यकर्त्याला फोनवरुन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, दमदाटी केली. भरचौकात मारण्याची धमकी दिली असून त्याप्रकरणी मोरे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घडामोडींमुळे आकुर्डी पोलीस चौकी परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या युवा मोर्चाचे माजी प्रदेश चिटणीस, राज्य माथाडी महामंडळाचे माजी सल्लागार सदस्य अनुप मोरे यांच्या मुजोरीची घटना समोर आली आहे. ‘शिवसेना नगरसेवकासोबत का फिरतो’, असे म्हणत एका कार्यकर्त्याला फोनवरुन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, दमदाटी केली. भरचौकात मारण्याची धमकी दिली. ‘महापालिका निवडणुकीपर्यंत अमित गावडे यांच्यासोबत फिरायचे नाही’, अशी दमबाजी केली. निवडणुकीला दीड वर्षाचा अवधी असताना आत्तापासूनच मोरे यांच्याकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याप्रकरणी मोरे यांच्यावर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपच्या माजी उपमहापौर शैलजा मोरे यांचे अनुप हे चिरंजीव आहेत. ते भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. प्राधिकरण सारख्या उच्चभ्रू आणि शांत परिसरात असा प्रकार होणे हे अशोभनीय आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. आमच्या हाती आलेल्या फोनच्या ऑडिओ क्लिप नुसार “सुरुवातच अवार्च्य शिवीगाळ करत सुरु केली. राजकारणात मी माफ करणार नाही. बापासमोर चौकात हाणणार आहे. दररोज मारील. यापुढे अमित गावडे सोबत दिसला नाही पाहिजे. आमच्यासोबत राहायचं तर इमानदारीत राहायचं. त्याच्यासोबत राहिचयं तर नुकसान पण सहन कराचयं. नुकसानच करणार, सोडणार नाही. त्यामुळे शेवटचे सांगतो. त्याच्यासोबत दिसला तर तुला त्रास होणार. तिथं दिसला तर उचलून नेईन, भर चौकात मारेल. हात पाय तोडीन. पालिका निवडणुकीपर्यंत अमित गावडे सोबत दिसला तर याद राख, माझ्या ऐवढे वाईट कोण नाही. मागच्या वेळी काय झालं होतं ते तुला माहिती आहे. शेवटची वॉर्निंग”, अशा प्रकारची धमकी देत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. याप्रकरणी मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.























Join Our Whatsapp Group