पिंपरी (Pclive7.com):- तमाम भारतीयांची अस्मिता, उर्जास्थान असलेल्या राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांना निवेदन पाठवून याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सुरेश निकाळजे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर काल संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय. कोरोनासारख्या भयानक साथींच्या पार्श्वभूमीवर केलेलें हे कृत्य निषेधार्ह आहे. या प्रकरणात सामील असलेले आरोपी आणि त्यामागे असणाऱ्या प्रवृत्ती यांचा उद्देश जातीय दंगली घडविण्याचा, भारतभरातील, जगभरातील आंबेडकर अनुयायांची अस्मिता दुखावून त्यांना आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा दिसत आहे.























Join Our Whatsapp Group