पिंपरी (Pclive7.com):- हिंजवडीसह परिसरात आज पासून (गुरूवार दि.०९) कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात यावा, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आले आहे.
हिंजवडीसह मान, मारुंजी, जांबे, नेरे, या ठिकाणीही लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा आणि आयटी कंपन्यांना यामधून वगळण्यात आल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले आहे.
हिंजवडी परिसरात आजपासून १६ जुलै पर्यंत कडकडीत लॉकडाऊन पाळला जाणार आहे. दरम्यान, यामधून अत्यावश्यक सेवा, आयटी कंपनी तसेच बांधकाम सुरू असलेल्या साईट्सना वगळण्यात आले आहे. अशी माहिती हिंजवडीच्या सरपंच आरती वाघमारे आणि मारुंजी सरपंच पूनम बुचडे यांनी दिली आहे.























Join Our Whatsapp Group