पिंपरी (Pclive7.com):- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता १०वी व १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात पिंपरी चिंचवड शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूल चिंचवड मधील १२वी विज्ञान शाखे मधुन प्रथम श्रीवास्तव हा विद्यार्थी ९७.८ टक्के गुण मिळवून पहिला आला आहे. तर स्नेहल भुजबळ ९६.२ टक्के, ओजस जोशी ९५.४टक्के, अनुष्का घोष ९५.४ टक्के, अविक जोशी ९५.४ टक्के तसेच वाणिज्य शाखेतून इशा मिश्रा ९६.२ टक्के गुण मिळवून पहिली आली आहे. एकता संध्या ९४ टक्के, अनुशा श्रीवास्तव ९१ टक्के गुण संपादन करत घवघवीत यश मिळवले आहे.
तसेच १० वी चा CBSE परीक्षेचा निकाल मागील १० वर्षांपासून निकालाची परंपरा कायम राखत अपेक्षेप्रमाणे मुलांनी परीक्षेमध्ये घव घावित यश मिळवले आहे. सर्व विद्यार्थी उत्कृष्ठ गुणांसह उत्तीर्ण झाले असून गौरवास्पद बाब म्हणजे शाळेतून परीक्षेला २७८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ११५ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले आहे. तर डीसस्टिक्शनमध्ये २५६ विद्यार्थी आले आहेत. ८० ते ९० टक्के दरम्यान १०४ विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहे. ७० ते ७९ टक्के दरम्यान ५१ विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहे. ६० ते ६९ टक्के दरम्यान ८ विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहे.
यश संदीप घोळकर ९८.६ टक्के गुण घेऊन पहिला आला आहे. तर आशिष कुमार पांडा ९७.८ गुण घेऊन दुसरा आला आहे. हर्षदा आत्रे ९७.६ टक्के, रिधी मन सुख ९७.६ टक्के, अहेली सेनगुप्ता ९७.६ टक्के गुण मिळाले आहे. शाळेत शिक्षकांनी घेतलेल्या अपार मेहनतीमुळे हे यश मिळाले आहे. त्यामुळे मुलांचे सर्वत्र कौतुक होत आहे असे प्राचार्य शहनाज कोटार यांनी सांगितले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे आधारस्तंभ डॉ.पवन पोदार सर, गौरव पोदार सर, फ्रँकलिन सर तसेच शाळेच्या प्राचार्य सौ.शहनाज कोटार, उपप्राचार्य अर्चना करंडे, मनिषा घोसारवडे, दिप्ती लगड, वैशाली रण सुबे, पुजा लोबो, नशिता शेख आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्याचे कौतुक केले आहे.






















Join Our Whatsapp Group