डॉ. डी. वाय पाटील एज्युकेशन कॉम्प्लेक्स आकुर्डी तर्फे आयोजित लाईव्ह वेबिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी (Pclive7.com):- कोणताही वाईट काळ हा दीर्घकाळ राहत नसतो. कोरोना संकटामुळे आपल्या मनात नकारात्मक विचार शिरू देऊ नका. या उलट कोविड महामारीचा काळ म्हणजे मानवाला स्वतःमध्ये परिवर्तन घडून आणण्याची एक संधी आहे. परिवर्तन हि विकासाची नांदी असते असे मत प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी व्यक्त केले.
आकुर्डीच्या डॉ.डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाच्या वतीने आयोजित केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये चेतन भगत बोलत होते.
यावेळी शैक्षणिक संकुलाचे संचालक कर्नल (नि) एस के जोशी यांनी आभार मानले. डी.वाय पाटील इंटरनॅशनल विद्यापीठातचे कुलगुरू डॉ. प्रभात रंजन, डॉ. डी वाय पाटील एमबीए कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ.शलाका पारकर, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर डॉ. जस्मिता कौर आदी उपस्थित होते.
चेतन भगत पुढे म्हणाले कि, ऑनलाईन ज्ञानदानात खंड पडला नसला तरी ऑनलाईन ज्ञानदान पद्धत पारंपारिक शिक्षणाची जागा घेवू शकत नाही. ऑनलाईन शिक्षण पद्धतीने शिक्षण देणे हा संकटकाळी तात्पुरता एक उत्तम पर्याय आहे. कला, कौशल्य, करियर, नाते संबध या विषयावर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे भगत यांनी दिली. आपल्या भविष्याचे ध्येय हे फक्त करिअर पुरते मर्यादित ठेऊ नका तर चांगले आरोग्य, मानसिक शांतता, नाते-संबंध याबाबत देखील विचार करा. आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे, काय आवडते हे विचार करण्याची हीच वेळ आहे. महाविद्यालयात शिकलेल्या टेक्निकल हार्डस्किलमुळे जॉब मिळतो तर सॉफ्टस्किलमुळे नोकरीत पदोन्नती मिळते. यामुळे सॉफ्टस्किल्स आत्मसात करणे गरजेचे आहे. ऑनलाईन शिक्षण पध्दतीमुळे आपल्याला इंटरनेटची ताकद कळून आली. कोरोना एक आयुष्याला लागलेले पॉझ बटन आहे. लवकरच सर्व परिस्थिती पूर्ववत होणार असल्याने निराश होवू नका असा सल्ला शेवटी त्यांनी दिला.






















Join Our Whatsapp Group