पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना गटनेते तथा नगरसेवक विश्वजीत बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त थेरगाव परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘९० दिवसांचे भव्य आरोग्य महायज्ञ’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत विविध वैद्यकीय तपासण्या, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि उपचार सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

हा आरोग्य महायज्ञ रविवार, १४ जून २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत रॉयल कोर्ट सोसायटी येथे आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या आणि कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये कॅन्सर संदर्भातील सर्व प्रकारचे मार्गदर्शन व सल्ला, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, कॅन्सर सर्जरी, एंजिओप्लास्टी, डायलायसिस, HbA1C तपासणी, फुल बॉडी जनरल चेकअप, मशीनद्वारे मोफत डोळे तपासणी तसेच अल्प दरात डोळ्यांच्या लेझर ऑपरेशनची सुविधा उपलब्ध असणार आहे.

आरोग्य विषयक कोणतीही हेळसांड न करता वेळेत तपासणी करून आजारांचे निदान करणे हे निरोगी आयुष्याचे महत्त्वाचे सूत्र असल्याचे आयोजकांनी सांगितले. रॉयल कोर्ट सोसायटीसह परिसरातील सर्व नागरिकांनी या आरोग्य महायज्ञात सहभागी होऊन उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी हेल्पलाइन क्रमांक ८३२७२४२४२४ वर संपर्क साधावा.
Tags: Vishwajeet Barne




















Join Our Whatsapp Group