पिंपरी (Pclive7.com):- देशाचे पंतप्रधान नरेंद्र यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राबवलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांच्या यशस्वी १२ वर्षांच्या प्रवासानिमित्त भोसरी, पिंपरी-चिंचवड येथे आमदार महेश लांडगे यांच्या वतीने नागरिकांसाठी भव्य जनकल्याण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष पिंक ई-रिक्षा योजना राबवली जाणार असून या योजनेत केवळ ₹5,000 डाउन पेमेंट, तीन दिवसांत थेट डिलिव्हरी, दरमहा ₹30,000 पेक्षा अधिक उत्पन्नाची संधी, मोफत प्रशिक्षण, चार्जिंग लायसन्स व विमा सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी वाहन परवान्याची आवश्यकता नाही.
“केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येक जनकल्याणकारी योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे, हे माझे कर्तव्य आहे. पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण पीएमआर परिसराचा सर्वांगीण विकास, महिलांचे सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगाराच्या संधी आणि सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी मोदी सरकार काम करीत आहे. ‘विश्वास, विकास आणि जनकल्याण’ या मूल्यांवर चालत प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाभिमुख हिंदुत्वाचा संदेश देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे




















Join Our Whatsapp Group