पिंपरी (Pclive7.com):- राज्यात जेथे जेथे माणुस अडचणीत सापडतो तेथेतेथे आमदार महेश लांडगे यांचा एक हात मदतीचा पोहोचतो. आता तर केवळ माणसांच्या वेदनांचेच नाही तर वास्तुच्या वेदनांचेही आवाज महेश लांडगे यांच्या मनाला ऐकावयास येवू लागले आहेत. पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष व भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी आंबडवे येथील शाळेच्या पुनर्वसनासाठी आपले सहा महिन्याचे वेतन अनुदान स्वरुपात देण्याचा निर्णय जाहिर केला असून यापुढेही या शाळेस आवश्यक आसलेली सर्व मदत केली जाईल असे जाहिर केले आहे.
जेथे माणुस आणि माणुसकी अडचणीत येते तेथे आमदार महेश लांडगे यांचा एक हात मदतीचा पोहचतो हे सर्वांनी अनुभवले आहे. सांगली कोल्हापूरचा पूर असो, कोरानात सापडलेला सर्वसामान्य कष्टकरी, मजूर असो, कोरोनाच्यामुळे स्थलांतरीत व्हावे लागणारा परप्रांतीय असो की, निसर्ग वादळाच्या तडाख्यात सापडलेला कोकणवासीय असो जेथे जेथे माणुस अडचणीत येतो व माणुसकी आक्रंदते तेव्हा तेथील अश्रू पूसण्यासाठी धावतात आमदार महेश लांडगे यांचे आपुलकीचे हात. आणि याचमुळे कोरोनात परप्रांतीय मजूर जेव्हा स्थलांतरीत होवू लागला तेंव्हा झारखंड, उत्तरप्रदेश, बिहार अशा राज्यातील आमदार खासदारांनी महेशदादांना फोन करुन लोकांना मदत करण्याची विनंती केली व केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद व्यक्त केले.
नुकत्याच झालेल्या चक्रीवादळात भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रत्नागिरी जिल्ह्यातील जन्मगांव आंबडवे यालाही फटका बसला. या वादळात आंबडवे येथील शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या शाळेचे छत वादळात उडाले व भींतही खचली होती. शाळेच्या पडक्या भिंतींचे विव्हळणे शेकडो किलोमीटरवर असलेल्या आमदार महेश लांडगे यांनाच ऐकू आले. राज्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते, विधान सभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधू न महेश लांडगे यांनी या शाळेस आपले सहा महिन्याचे वेतन मदत म्हणुन देण्याचे जाहिर केले आहे. एवढेच नव्हे तर या शाळेच्या पुनःउभारणीसाठी लागणारी सर्व मदत देण्याचे आमदार महेश लांडगे यांनी जाहिर केले आहे.























Join Our Whatsapp Group