पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेवकाने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत दमबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार रात्री घडला आहे. त्याच्या निषेधार्थ वायसीएम रुग्णालयात डाॅक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पिंपरीतील भाजपच्या एका नगरसेवकाने रविवारी रात्री उशिरा गोंधळ घातला. डॉक्टर आणि संबंधित कर्मचाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली. यावर संबंधित कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या ‘डीन’ ला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण रात्री त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, संतापलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सोमवारी सकाळपासून संप सुरू केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे वायसीएम रूग्णालात डॉक्टरांचे काम बंद आंदोलन सुरू झाल्यामुळे रूग्णांच्या उपचारावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. सत्ताधारी आणि प्रशासनाकडून होत असलेल्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.




















Join Our Whatsapp Group