पिंपरी (Pclive7.com):- चिखली येथील जाधववाडी परिसरात विक्रीसाठी आणलेला अवैध गुटख्याचा १ लाख ७९ हजार किंमतींच्या मुद्देमालासह पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी विनोद चुनिलाल गुर्जर (वय २३, रा.बोलाई माता, जाधववाडी, चिखली) याला पोलीसांनी अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद गुर्जर याने चिखली परिसरात २५ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नॅनो कारमधून गुटखा विक्रीसाठी आणला होता. जाधववाडी येथे त्याची झडती घेतली असता कारमध्ये प्रतिबंधित गुटखा सदृश्य पदार्थ त्यामध्ये विमल पान मसाला (लाल), विमल पान मसाला (निळा), विमल पान मसाला (हिरवा), राजनिवास पान मसाला, महक पान मसाला, हॉट पान मसाला, मिराज पानमसाला, आर.एम.डी पानमसाला, तंबाखु गायछाप, असा गुटखा सदृश्य माल गाडीसह १ लाख ७९ हजार १५८ रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला. आरोपीकडे चौकशी केली असता त्याने हा गुटखा विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. हा माल त्याने धनराज चौधर, नितीन छाजेड, महेंद्र राठोड, शाकीब (रा. कोंढवा, पुणे. पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्याकडून घेतला असल्याचे सांगितले.
याप्रकरणी आरोपी विनोद चुनिलाल गुर्जर याला अटक करण्यात आली असून चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बागुल पुढील तपास करीत आहेत.























Join Our Whatsapp Group