मावळ (Pclive7.com):- पवना धरण ९८ टक्के भरले असुन सततच्या पावसामुळे धरणाचा पाणीसाठा १०० टक्के होईल. या पार्श्वभूमीवर आज खासदार श्रीरंग बारणे यांचे हस्ते धरणाचे ६ दरवाजे उघडुन २२०० क्युसेंस पाणी सोडण्यात आले.
या प्रसंगी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अशोक शेटे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, भारत ठाकुर, अमित कुंभार, शांताराम भोते, उमेश दहीभाते उपस्थित होते.
राज्यातील व पुणे जिल्ह्यांतील सर्व धरणे १०० टक्के भरले असुन या वर्षी पवना धरण उशीरा पुर्ण क्षमतेने भरले आहे. आज खासदार श्रीरंग बारणे यांचे शुभहस्ते धऱणाचे ६ दरवाजे उघडून २२०० क्युसेंस पाणी पवना धरणातून सोडण्यात आले तसेच पवना धरणाच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले.
पवना धरणाची पाणीसाठा क्षमता ८.५१ टी.एम.सी असून त्यातील ६.५० टी.एम.सी पाणी पिंपरी चिंचवड शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी वापरले जाते.
या वर्षी धरण ९८ टक्के भरल्याने व पवना धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आसल्याने आज धरणातून २२०० क्युसेंस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले असून पवना नदी काठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पवना नदीपात्रा लगत असणाऱ्या गावांना तसेच शेतीलाही पवना धरणातील पाण्याचा पुरवठा होतो. पवना धरण पुर्ण क्षमतेने भरले असून पुढील एक वर्षाची पाण्याची समस्या दुर झाली आहे असे खासदार बारणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले























Join Our Whatsapp Group