पिंपरी (Pclive7.com):- जनशक्ती युवा संघटनेची पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष हरीष शिवनेचारी व उपाध्यक्ष सचिन जाधव यांनी ही नियुक्ती केली आहे. पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष म्हणून आकाश भोसले यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक कार्याची आवड तसेच लोकसहभाग पाहून निवड केली आहे. तसेच उपाध्यक्षपदी अजय गिरी यांची निवड करण्यात आली आहे.
जनशक्ती युवा संघटनेचे पिंपरी चिंचवडचे नवनियुक्त अध्यक्ष आकाश भोसले व उपाध्यक्ष अजय गिरी यांनी त्यानंतर नवीन कार्यकारिणी जाहीर केली. ती पुढील प्रमाणे :- मंगेश कोंढाळकर (कार्याध्यक्ष), अमोल नाणेकर (कोषाध्यक्ष), महेश वाघेरे (सचिव), श्याम नढे (सहसचिव), रणजित भोसले (चिटणीस), अंकित कदम (सरचिटणीस), नितीन वाडकर (प्रवक्ता), गणेश खिलारे (शहर संघटक), तसेच विशाल वाघुंबरे, प्रदीप तरडे, कौस्तुभ काटे, राजेंद्र बारशिंगे, अनिरुद्ध परदेशी, गणेश साळवी, अनिकेत घारे, रोहित शिंदे, संदीप सलकर, अक्षय वाळके, कुणाल मुळे यांची कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
राज्यामध्ये जनशक्ती युवा संघटना ही सामाजिक कार्यासाठी लढा देणारी अग्रेसर संघटना म्हणून ओळखले जाते. राज्यातील विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवण्याचे कार्य ही संघटना करत आहे. राज्यातील अनेक गोरगरिबांवर जो अन्याय, अत्याचार होतो त्याविरोधात ही संघटना लढा देते. राज्यातील युवकांना संघटित करून ही संघटना कार्य करत आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. तसेच अनेक उद्योगधंदे राज्यात विकसित होत असताना स्थानिक तरुण मात्र आजही बेरोजगार आहे. आजही अनेक कंपन्यांमध्ये परप्रांतीय लोकांची भरती केलेली दिसून येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांचा मालकी हक्क प्रस्थापित झाल्याचे दिसून येते. म्हणून या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील युवकांना न्याय मिळवून देणे हा मुख्य हेतू आहे. तसेच समाजातील युवकांना नेतृत्व, विचार मांडण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून एक नवीन व्यासपीठ उपलब्ध होत आहे.




















Join Our Whatsapp Group