पिंपरी (Pclive7.com):- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरीतील सफाई कर्मचारी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना वाफेचे मशिन (वॅपोरायझर), मास्क आणि हॅन्डग्लोजचे वाटप करण्यात आले. भाजप नगरसेविक संदीप वाघेरे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात भाजपाच्या वतीने ‘सेवा सप्ताह २०२०’ राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने पिंपरीतील सफ़ाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी वर्गाला वाफेचे मशिन (वॅपोरायझर), मास्क आणि हॅन्डग्लोजचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास मंडल सरचिटणीस गणेश ढाकणे, प्रभाग अध्यक्ष जयेश चौधरी, सोनु कदम, संतोष केदारी, किरण शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group