पिंपरी (Pclive7.com):- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा सप्ताह निमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर जिल्हातर्फे प्रभाग क्रमांक १७ (बिजलीनगर) मध्ये लक्ष्मण जगताप व भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या हस्ते झाले. पिंपरी येथील पीएसआय ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी २४ रक्त पिशव्यांचे संकलन केले. याप्रसंगी, रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानीय करण्यात आले. दगडोबा चौकातील नामदेव ढाके यांच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात झालेल्या शिबिराचे संयोजन युवा मोर्चाचे भूषण माळी, संदीप पाटील यांनी केले.
तत्पूर्वी, सेवा सप्ताह निमित्ताने प्रभाग १७ मधील सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी, प्रभागात अविरतपणे स्वच्छतेची सेवा देणाऱ्या सफाई कर्मचारी यांचा गुलाबपुष्प, प्रमाणपत्र व मिठाई देऊन सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच, त्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी हँड ग्लोज व मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, शेखर चिंचवडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन शंकर पाटील, नवनाथ वाघमारे, प्रदीप पटेल, शुभम ढाके, कैलास रोटे, वसंत नारखेडे, चेतन महाजन, योगेश महाजन आदिंनी केले.























Join Our Whatsapp Group