पिंपरी (Pclive7.com):- यंदा सर्व सणांप्रमाणे बैल पोळा या सणावरही कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे बळीराजाला यंदाचा बैलपोळा हा घऱच्याघरीच साजरा करावा लागला आहे. पिंपरी चिंचवडचे भाजपाचे शहराध्यक्ष तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी देखील सहकुटुंब पारंपारिक पद्धतीने आजचा बैल पोळ्याचा दिवस आपल्या शेतामध्येच शेलपिंपळगाव येथे साजरा केला.
सध्या कोरोनाच्या काळात नेहमीप्रमाणे बैलांना सजवणं जमले नसले तरी गुलाबी रंगाच्या टुमदार गोंड्यांनी बैलांची शिंगे सजवली होती. तर, फुलांच्या माळांनी सर्जा-राजाची ही जोडी अजूनच खुलून दिसत होती.
बैलांची पुजा करून महेश लांडगे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच प्रत्येकाने यंदाचा बैलपोळा घरच्याघरीच साजरा करावा असं आवाहनही केलं आहे.























Join Our Whatsapp Group