पिंपरी (Pclive7.com):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधवासाठी पुणे जिल्हा भाजयुमो विद्यार्थी आघाडीच्या वतीने खास सुंदर बैल जोडी छायचिञ स्पर्धा ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. घरी साजरा होणाऱ्या पोळा सणाच्या निमित्ताने सजवलेल्या बैलजोडीचा एक फोटो आणि व्हिडीओ पाठवण्याचे आव्हान करण्यात आले होते.
कोविड-19 च्या कुठल्याही आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आव्हान संयोजकांनी केले होते. पशुधन व मुक्या प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व आपल्या संस्कृती ते जतन करण्यासाठी ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत संजय जगन्नाथ पवार (खेड) यांच्या बैलजोडीने प्रथम, नामदेव पंढरीनाथ डुबे (दौंड) यांच्या बैलजोडीने दुसरा तर विशाल गबाजी आंद्रे यांच्या बैलजोडीने तिसरा क्रमांक पटकवला.
स्पर्धेत अनेक बैलांच्या पाठीवर असलेले चिञ सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. त्यामध्ये राम मंदीर, मराठा आरक्षण, कोरोना या सारखे असंख्य विषय बैलांच्या पाठीवर रंगवले होते.
स्पर्धेचे आयोजन पुणे जिल्हा भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे उपाध्यक्ष संस्कार चव्हाण व शिरुर तालुका भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष अनिकेत राक्षे यांनी केले होते.






















Join Our Whatsapp Group