पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीचिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रामदास गेनभाऊ बोकड यांचे आज वयाच्या ६० व्या वर्षीअल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
सामाजिक कार्यकर्ते ते नगरसेवक आणि सहकार चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते असा त्यांचा प्रवास होता. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप याचे ते समर्थक होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत २०१२ मध्ये पिंपळे गुरवमधून रामदास बोकड बिनविरोध निवडून आले होते. तसेच २०१३ मध्ये रामदास बोकड हे पिंपरी चिंचवड मनपा क्रीडा समितीचे सदस्य होते.
सह्याद्री आदिवासी तरुण मंडळाचे ते काही काळ अध्यक्ष होते. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव- वैदू वस्तीचे हसरे व्यक्तिमत्व, आदिवासी समजाचे कार्यकर्ते म्हणुन रामदास बोकड यांची ओळख होती.






















Join Our Whatsapp Group