पिंपरी (Pclive7.com):- कोरोना महामारीमुळे वासुदेव दिसेनासे झालेत तर काही वासुदेवावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना सरकारच्या मदतीची गरज आहे. मी त्यांना मदत केली आहे, आपण सर्व नागरिकांनी देखील आपापल्या परीने मदत करण्याचे आवाहन मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी केले आहे.
जोगदंड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सकाळच्या प्रहरी घरोघरी जाऊन पांडुरंगाची अभंग, गवळणी, गात “दान पावले, दान पावले”, म्हणणारा लोककलाकाराची कोरोना महामारीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. डोक्यावर मोरपीस, पायघोळ अंघरखा, धोतर, एका हातात टाळ, चिपळया, कमरेला पावा, गळ्यात झोळी, कवड्यांची माळ, असा पेहराव करून, “वासुदेव हरी, वासुदेव हरी। सकाळच्या पारी वासुदेवाची स्वारी”। असे गाणे म्हणत म्हणत फिरत असतात. सध्या पाश्चिमात्य संस्कृतीमुळे भारतीय लोककला लुप्त होत चालली आहे.
पुर्वीच्या काळी वासुदेव दारात येणे म्हणजे श्रीकृष्ण घरी आल्याचा आनंद होत असे लहान मुले व वयोवृद्ध ही नमस्कार करत व आर्शिवाद घेत असत. घरातील महिलाही सुपात धान्य घेऊन वासुदेवास देऊन आर्शिवाद घेत असे.
कोरोना महामारीमुळे वासुदेव दिसेनासे झालेत तर काही वासुदेवावर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या कोरोनामुळे कोणी ही आर्थिक व धान्याच्या रुपात मदत करत नाहीत. असे सकाळच्या प्रहरी आलेले वासुदेव धनाजी गोधे, व प्रविण वाईकर यांनी सांगितले.
आम्ही हि लोककला लहापणापासुन जपली आहे असे त्यांनी सांगितले. त्यांना सरकारच्या मदतीची गरज असल्याचे मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी सागितले. मी ही त्यांना मदत केली आहे आपण सर्व नागरिकांनी आपापल्या परीने मदत करण्याचे आव्हान जोगदंड यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group