
सीएनजी आता ९५.७५ रुपयांवर..
वाहनांसाठी स्वस्त आणि पर्यायी इंधन असलेल्या ‘सीएनजी’च्या किमतीत प्रतिकिलो १ रुपयाने वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर आता पुणेकरांना एक किलो सीएनजीसाठी ९५ रुपये ७५ पैसे मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांतील ही सलग तिसरी दरवाढ आहे. यापूर्वी ८ मे रोजी प्रतिकिलो दीड रुपया आणि २८ मे रोजी अडीच रुपयांची वाढ करण्यात आली होती.
घरगुती पीएनजीच्या दरातही वाढ
केवळ वाहनांचे इंधनच नाही, तर घरगुती पाईप गॅस (PNG) वापरणाऱ्या ग्राहकांनाही या दरवाढीची झळ बसली आहे. पीएनजीच्या किमतीत ८५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता पीएनजी ५० रुपये ६५ पैशांवरून ५१ रुपये ५० पैसे प्रति घनमीटर दराने मिळणार आहे.





















Join Our Whatsapp Group