पिंपरी (Pclive7.cm):- उत्तरप्रदेशातील अत्याचारी हत्याकांडात बळी पडलेल्या स्व.मनिषा वाल्मीकी या मृत पिडीतेच्या घरी जात असताना काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना उत्तरप्रदेश सरकारकडून रस्त्यावरच अडवले गेले व राहुल गांधींना धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकाराचा तीव्र निषेध पिंपरी येथे काँग्रेस कार्यकर्त्यां कडून करण्यात आला.
पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सायंकाळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले व निषेध सभेद्वारे वरिल कृत्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी “राहुल गांधी संघर्ष करो हम आपके साथ है” “काँग्रेस पक्षाचा विजय असो” “योगी हमसे डरता है पुलिस को आगे करता है”“भाजपा सरकार मुर्दाबाद” अशा घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा दहन करण्यात आला.
याप्रसंगी कामगार नेते पुणे जिल्हा इंटक चे अध्यक्ष डाॅ. कैलास कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एनएसयुआयचे माजी प्रांताध्यक्ष मनोज कांबळे, एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, एनएसयुआयचे शहराध्यक्ष डाॅ. वसिम ईनामदार, अशोक काळभोर, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, चिचंवड विधानसभा युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, पर्यावरण विभागाचे शहराध्यक्ष उमेश बनसोडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.